*तुमच्या दुकानात देव मिळेल कां?*
*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.*
*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?*
*त्या मुलाने दुकानदारास विचारले*
*तुमच्या दुकानात देव मिळेल का?*
*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.*
*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.*
*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?*
*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?*
*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?*
*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?*
*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.*
*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?*
*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*
*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.*
*आहे ना तुमच्या दुकानांत देव?*
*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?*
*फक्त एक रुपया बाबा.*
*बरं, नको काळजी करू.*
*एक रुपयात देखील देव भेटेल!*
*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.*
*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.*
*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.*
*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.*
*यालाच म्हणतात विश्वास ...*
*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.*
*तात्पर्य:*
*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!*
🌹 *गुरु* 🌹
*बारा प्रकारचे गुरु*
--------------------
पांडवप्रतापाच्या पांचव्या अध्यायांत पुढें दिल्याप्रमाणें बारा प्रकारचे गुरु आहेत --
*१ . धातुर्वादीगुरुः*
शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ती करून देतो .
*२ . चंदनगुरुः*
चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो . पण ( पण हिंगणवेळू व केळें हे वृक्ष सोडून ) तसा अभक्त दूर करून आपल्या केवल समागमानेंच हा गुरु भक्तांस तारून नेतो .
*३ . विचारगुरुः*
नित्यानित्यविचारानें शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्मानें साक्षात्कार करून देतो .
*४ . अनुग्रहगुरुः*
शिष्यावर कृपानुग्रह करतो . त्याच्या प्रतापानेंच सायास न होतां शिष्यास ज्ञान होतें .
*५ . परीसगुरुः*
परीस ज्याप्रमाणें स्पर्शमात्रेंकरून लोहाचे सुवर्ण बनवितो त्याप्रमाणें स्पर्शानें शिष्यास गुरुत्व प्राप्त होतें .
*६ . कच्छपगुरुः*
कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते , त्याप्रमाणें हा कृपावलोकनानेंच शिष्याचा उद्धार करतो .
*७ . चंद्रगुरुः*
चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .
*८ . दर्पणगुरुः*
आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .
*९ . छायानिधिगुरुः*
छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .
*१० . नादनिधिगुरुः*
नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .
*११ . क्रौंचपक्षीगुरु*
क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते आणि वारंवार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरु ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .
*१२ . सूर्यकांतगुरुः*
सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रमाणे ह्या गुरूची दृष्टि जिकडे झळकते ते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय .
*मदत*
एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो ...की ती आपल्याकडून करवून घेतली जाते???
दोन्ही प्रश्नाचे उत्तर' हो' असेच असेल नाही का? तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा ....
आर्ट ऑफ लिविंग चा बेसिक कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की आता पुढेचे 15 मिनिट या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.
आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला," आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो ," त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, "बाजूला हो ....आला मोठा मदत करणारा" 😡 ... एक प्रयत्न तर फसला😔
वेळ आता दहाच मिनिट उरला होता. पुन्हा शोधा शोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो चल तुला वडापाव खायला देतो. त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. नको नको म्हणत दूर पळून गेली🫣🫣
आता पाच मिनिटे राहिले😟 शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्क बद्दल सांगितले. आणि तुम्हाला काही मदत करू का असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला, माझे वडे बिघडवून ठेवाल असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो😔😔
आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले," आता तुमच्या लक्षात आले असेल मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर "मी केली" असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छे शिवाय हे शक्य नाही हे ध्यानात ठेवा.
ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृती वेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले.यामुळे 'अहंकाराचा वारा' काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की😊
आपणा सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा...
*जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात.*
*अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून तीला अक्षय तृतीया म्हणतात.*
*आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधीही क्षय होत नाही अशी अनुभुती आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या भविष्याच्या दृष्टीने नविन संकल्प धरा.*
💐तुम्हा सर्वांना अक्षय्य शुभेच्छा💐
*कर्मफळ / प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं*
कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाऊंट्स क्लीअर करण्यासाठी झालेली असते, "ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुनःपुनः भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो." *कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते, म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात.*
"सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य 'जवळच' असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते, *गुरु कधीही 'करावे' लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात! आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकचं!"*
एकदा सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला, की आपण आपल्या प्रत्येक कर्मास 'सद्गुरार्पण' करावयास शिकतो, *मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेतेय ही 'विनम्रता' अंगी रुजते आणि मग अर्थातच 'कर्तेपणाचा' अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म 'अकर्म' घडून कर्मबंधनातून हळुहळू मुक्त होण्यास आरंभ होतो.* म्हणूनच सद्गुरुकृपेचे महत्त्वं अनन्यसाधारण अाहे.
तरी प्रारब्धभोग टळत नाहीत, गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्धकर्म भोगणे अनिवार्य असते. गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठिण काळात देखील शिष्याच्या चेहर्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच, फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते.
*आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सूटका कधीही नसते, म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे, परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, 'आत्म्यास पटलेले', सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध, केवळ जगाला दाखवायला, ह्रदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करु नये ते यासाठी.*
ज्योतिष्य आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणार्या घटनांचा केवळ आलेख देतं, पण *गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करुन 'कर्माप्रती सजग' करत जाते. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा, ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका यात भरकटत बसत नाही!* तर......
*सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो....!!!**कर्मफळ / प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं*

*सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो....!!!*